जाणिवजनक - भाग 9
मानवी भाषेने स्वर आणि व्यंजन स्विकारण्याबाबतचे अचूक निर्णय कोणत्या नैसर्गिक
नियमांवर आधारलेले असावेत? मराठीने त्यांचे पालन केले आहे का? या मागील लेखातील
प्रश्नाच्या उत्तराचा पुढील भाग.
मागील लेखांतून आपण ‘उच्चार’ या विभागातील ‘शाश्वत-गृहीत-1 = भाषेत वापरले
जाणारे उच्चार, ‘वेदना न देणार्या’ व ‘सर्वाना सहजतेने मुखातून निर्माण करता
येणार्या’, ध्वनीच्या गुणधर्मांवर आधारीत असावेत’ याबाबत मराठीने स्विकारलेला
पुढील भाग बघीतला.
तरतुद-1.1 = लहान-मोठेपणा या ध्वनी गुणधर्मावर मराठीने भाषीक-अर्थ अवलंबून
ठेवलेला नाही.
तरतुद-1.2 = उच्च-नीचता या ध्वनी गुणधर्मावर मराठीने भाषीक-अर्थ अवलंबून
ठेवलेला नाही.
तरतुद-1.3 = भाषेतून सहजपणे वापरता येतील आणि ऐकून ज्याची समान जाणीव सर्वांना
होईल, अशा उच्चारीत ध्वनींच्या मानवाला होणार्या नैसर्गिक जाणीवांना मराठीने
स्विकारले आहे.
आता आपण चर्चा पुढे नेऊ.
याला ‘मराठीचा कंप-ध्वनी स्फोट-ध्वनी सिद्धांत’ असे नाव आहे.
ध्वनी : स्फोटध्वनी व कंपध्वनी निर्मितीचे टप्पे आणि मानवी आकलन
टप्पा 1 : मानवाला ध्वनी ऐकू येतो तेव्हा तेथे हवेची उपस्थिती असते. एकापेक्षा जास्त वस्तुतील गती फरक म्हणजे आघात होय. ‘वस्तु 1' आणि ‘वस्तु 2' यांना दोघांना गती आहे वा दोघांपैकी एकाला गती आहे. त्यांच्या परिसरात हवा आहे.
टप्पा 2 :
‘वस्तु 1' आणि ‘वस्तु 2' यात आघात होतो. यावेळी हवा तेथे उपस्थित आहे. गतीतील उर्जेचे रूपांतर गतीफरकामुळे इतर उर्जेत होते. ह्या इतर उर्जेतील उष्णता व ध्वनी आपल्याला जाणवतात.
टप्पा 3 : गतीफरकातून निर्माण झालेली उर्जा ‘वस्तु 1', ‘वस्तु 2' आणि हवा यांना प्राप्त होते. ह्या टप्प्यात पुढील गोष्टी एकाच वेळी घडून येतात. 1] ‘वस्तु 1' मध्ये कंपने निर्माण होतात. 2] ‘वस्तु 2' मध्ये कंपने निर्माण होतात. 3] हवेत स्फोटध्वनी वाहू लागतो. केवळ दोन वस्तुंतील आघात-वेळे
एवढीच, म्हणजेच केवळ क्षणभरच स्फोटध्वनीची आपणास ऐकून जाणीव होते.
टप्पा 4 : वस्तुत निर्माण झालेली कंपने हवेत कंपध्वनी निर्माण करतात. कंपध्वनी स्फोटध्वनीच्या मागोमाग संलग्नपणे वाहू लागतो. मानवाला ऐकू येणारा ‘ध्वनी' हा अशा रीतीने स्फोटध्वनी व कंपध्वनी यांच्या संयुगातून निर्माण होतो. हवेला प्राप्त झालेली आघातातील उर्जा हवेतील अणूअणूतून हस्तांतरीत होते त्याला आपण स्फोटध्वनी म्हणतो. वस्तुला प्राप्त झालेली आघातातील उर्जा वस्तुतील अणूअणूंना मिळते. वस्तुतील अणूअणूंना मिळालेली ही अधिक उर्जा, वस्तुला लागून असलेल्या हवेतील अणूअणूत हस्तांतरीत होते. ह्याला आपण कंपध्वनी म्हणतो. ‘स्फोटध्वनी
+ कंपध्वनी' संलग्नपणे वाहात जातात, त्याला आपण ध्वनीगोल म्हणतो. त्यामुळे ध्वनीगोलाचे ‘कवच’ हा स्फोटध्वनी व त्याची ऐकू येणारी ‘जाडी’ म्हणजे कंपध्वनी ठरतो. ध्वनी-गोलाच्या
प्रवासात हळूहळू ध्वनी-उर्जेतील ताकद कमीकमी होत जाते. मानवाला ध्वनी ऐकू
येण्यासाठी कमीतकमी शुन्य डेसिबलपेक्षा जास्त ताकदीचा ध्वनी लागतो. जर
ध्वनी-उर्जेची ताकद त्यापेक्षा कमी झाली तर तो ध्वनी मानवाला ऐकू येत नाही.
‘मराठीचा कंप-ध्वनी स्फोट-ध्वनी सिद्धांत’ हा मराठी व्याकरणाचा अविभाज्य भाग
ठरतो. कारण यातून ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे मराठी भाषा ‘सुक्ष्मतेतून
भव्यतेकडे’ कसा प्रवास करते ते शास्त्रीयतेने कळते. एवढी शास्त्रीयता जगातील
कोणत्याही भाषेला गाठता आलेली नाही.
संस्कृतला कळलेला, उमगलेला आणि भाषेत वापरता आलेला ‘स्फोट ध्वनी’ सिद्धांत
अगदीच अपुरा आणि कालबाह्य ठरतो. आजच्या सायन्सच्या कोणत्याही कसोटीला पूर्णपणे
उतरणारा ‘मराठीचा कंप-ध्वनी स्फोट-ध्वनी सिद्धांत’ आहे.
ध्वनीतून होणार्या अर्थप्राप्तीची प्रक्रिया ‘स्फोट’ या शब्दातून व्यक्त करत,
संस्कृतने ‘वर्ण, पद, अखंड पद, वाक्य, अखंड वाक्य, वर्णजाती, पदजाती, वाक्यजाती
असे ‘स्फोट’ मानले आहेत. यातून ‘स्फोट’ शब्दाचा निश्चित अर्थ संस्कृतला देता आला
नाही. पाणिनींच्या सुत्रापासून, नागोजी-भट्टांपर्यंत आणि पुढे आजपर्यंत म्हणजे
गेली अडीच हजार वर्षे संस्कृतच्या ‘स्फोट’ शब्दाचा निश्चित शोधता आलेला नाही. याउलट
मराठीच्या मराठमोळ्या व्यंजन-स्वर या साध्यासुध्या पण ध्वनी-शास्त्रातील अत्यंत
सुक्ष्म ठरणार्या संकल्पना मानवाच्या कोणत्याही भाषेला लागू पडतात.
दोन गोष्टींच्या आघात स्थळी, हवेचे अस्तित्व असले की ध्वनी निर्माण होतो.
हवेतून ध्वनी वाहतो, म्हणजे नक्की काय घडते? (याला आपण ‘‘ध्वनी-उर्जा-वहन’’ असे
नाव देऊ) आणि मानवी मेंदूतील अनुभव, आठवणी, बुद्धी, मन, जाणीवा वगैरेंतून
एकमेकांशी अंतर्गत दळणवळण साधले जाते, म्हणजे नक्की काय घडते? (याला आपण
‘‘मेंदूतील-उर्जा-वहन’’ असे नाव देऊ) या दोन्ही ठिकाणी उर्जा वाहते, वस्तुमान
नाही. वायरीतून जसा विजेचा प्रवाह वाहतो अगदी तसाच हवेच्या कणाकणातून ध्वनी
उर्जेचा प्रवाह वाहतो त्याला आपण ध्वनी म्हणतो. विजेच्या प्रवाहातून वाहणार्या
उर्जेचा सुक्ष्मपणे अभ्यास मानवाला करता आला. उर्जेच्या या सुक्ष्म-कणाला आपण ‘क्वान्टम’ (Quantum = The basic unit of
radiant energy; the smallest amount of energy capable of existing independently) या
नावाने विज्ञानात जाणतो. मग भाषा-ध्वनीबाबतच्या उर्जेचा सर्वात सुक्ष्मकण विज्ञानाला
का मांडता आला नाही? याचे एकमेव आणि निश्चित कारण म्हणजे भाषा-ध्वनीचा सर्वात
सुक्ष्मकण इंग्रजी, संस्कृत वा जगातील कोणत्याही भाषेला आत्मसात करून भाषेतून
वापरता आला नाही. जर भाषेलाच ध्वनीचा सुक्ष्मकण कळला नाही तर भाषेतून तो
मांडण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमताच भाषा गमावून बसते. आजवर संस्कृत व
इंग्रजीने जगाला भरभरून दिले आहे, आता यापुढे मराठी-भाषा जगाला भरभरून
भाषा-विज्ञानाचे ज्ञान देणार आहे.
भौतिक जगातील वस्तु 117 मुलद्रव्यातून (Total 117 elements) बनलेल्या असतात. त्यांना आपण
‘अणु’ (atom)
नावाने ओळखतो. ‘अणुं’मधून ‘रेणू’ (molecule) बनतात. अगदी सुक्ष्मते कडून भव्यतेकडे
जाणार्या भाषा-ध्वनीच्या अस्तित्वाची पद्धत निसर्गाने मानवावर लादलेली आहे. पण
आजवर केवळ मराठीला याचे पूर्ण ज्ञान होऊन ते कळत न-कळत मराठी-भाषेतून वापरलेही जात
आहे. आता ते ज्ञान अचूक शास्त्रीय विज्ञान म्हणून जगापुढे मांडणे गरजेचे आहे.
ध्वनीगोलाच्या कवचातुन पुढे पुढे सरकणारी बिनीची (सर्वात पुढे असणारी)
ध्वनी-उर्जा (impinging
sound wave) म्हणजे ‘स्फोट-ध्वनी’ होय. त्याच ध्वनीगोलात ध्वनी-कवचाला
चिटकून त्याच्या मागेमागे वाहणारी ध्वनी-उर्जा म्हणजे कंप-ध्वनी होय. उदाहरण –
घंटे वाजवली की त्यातून निर्माण होणार्या ध्वनीतील, ध्वनी-कवचातून वाहणारा, प्रथम
ऐकू येणारा ध्वनी म्हणजे ‘टोल’ होय. त्यानंतर त्यालाच चिटकून बराच वेळ ऐकू येणारा
ध्वनी म्हणजे ‘कंप-ध्वनी’ होय. घंटा वाजवताना वापरल्या गेलेल्या ताकदीप्रमाणे
त्यातील ‘टोल’ याचा लाऊडनेस वाढतो वा कमी होतो आणि तसेच त्यानंतर ऐकू येणारा
‘कंप-ध्वनी’ जास्त वेळ वा कमी वेळ टिकतो.
निसर्गाने मानवाला भाषा दिली नाही. भाषा बनविण्याची साधने दिली. ‘भाषा
बनविण्याची साधने यात ‘‘‘मुखातील उच्चारासाठीची इंद्रिये, ऐकू येण्याची क्षमता,
भाषेने स्विकारलेले व वापरलेले उच्चार, उच्चारांतून अक्षर व शब्द यांच्या
निर्मितीचे धोरण, मेंदूतील भाषा-केंद्रातून त्याची करता येणारी प्रतिष्ठापना, . .
. वगैरे’’’ गोष्टी यात मोडतात. याच साधनांचा वापर करून मानवाने भाषा निर्माण
केल्या. या मानवी भाषांना ‘‘‘निसर्ग मानवाला भाषेतून काय, कसे, किती व कुठे देऊ
शकतो?, याची जाण ठेऊन ‘‘ध्वनी-उर्जा-वहन’’ आणि ‘‘मेंदूतील-उर्जा-वहन’’ यात समान
एकजूटता आणण्याची किमया करता आली नाही. मराठी या एकमेव मानवी भाषेने ती आत्मसात
करून शेकडो वर्षे वापरून दाखवली आहे. मराठी भाषेला उमगलेला हा परिसर इतका सुक्ष्म
आहे की मानवी भाषेच्या वापरातील ‘गद्य, पद्य व संगीत’ या विभागासाठीचे
‘‘ध्वनी-उर्जा-वहन’’ आणि ‘‘मेंदूतील-उर्जा-वहन’’ यात एकरूपता आणण्यापर्यंत मराठीने
मजल मारली आहे. मराठीने गद्यासाठी केवळ ‘एक वेलांटी एक उकार’ मोडीतून वापरण्याचे
हेच शास्त्रीय कारण आहे. याबाबतचा मजकूर पुढील काही लेखांतून आणण्याचा प्रस्ताव
विचाराधीन आहे. जर काही व्यक्तिंना यात मनापासून कुतूहल असून त्यातील संशोधनात भाग
घ्यायचा असेल तर त्यांनी जरूर फोन करावा.
याशिवाय आम्हाला अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच ‘जाणीवजनक’
https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या
ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मिळवा.
No comments:
Post a Comment