Tuesday, 7 January 2014

जाणिवजनक - भाग 1



जाणिवजनक - भाग 1

भाषा नक्की काय करते?
विचार आणि भावनांचे आदानप्रदान.

मग यासाठी भाषेशिवाय दुसरे कोणते सक्षम साधन मानवाकडे आहे का?
नाही.

जग बैलगाडीचे असो वा संगणकाचे मानवाला भाषा हे साधन वापरावेच लागते का?
होय.

निसर्गाने मानवाला भाषा दिली आहे का?
नाही.

मग मानवाला भाषा कशा निर्माण करता येतात?
निसर्गाने मानवाला भाषा बनविण्याची केंद्रे मेंदुत दिली आहेत.

प्रत्येक भाषेत शब्द असतात का?
होय.

भाषेत शब्द असण्याचे कारण काय?
विचार आणि भावनांचे आदानप्रदान म्हणजे अर्थांचे आदानप्रदान होय. अर्थ व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द होय. उच्चारीत ध्वनीच्या अविष्काराला अर्थ जोडता येतो.

उच्चारीत ध्वनीम्हणजे नक्की काय?
उच्चारीत ध्वनीला सुरवात व शेवट असतो. म्हणजेच उच्चारीत ध्वनीच्या आधी आणि नंतर विराम येतो. विरामाच्या कोंदणात असलेला निश्चित ध्वनी म्हणजे उच्चारीत ध्वनीहोय.

उच्चारीत ध्वनीची लांबी वेळेत मोजता येते का?
होय.

सर्व उच्चार ध्वनीएकाच लांबीचे असतात का?
नाही.

असे का घडते?
उच्चार ध्वनीची जाण आपणास ऐकून होते. म्हणजेच मुखातील अवयवांच्या हालचालीतून निर्माण केलेल्या ध्वनीची पोत, कालमापन, वगैरे केवळ ऐकल्यानंतरच कळतात. ऐकू येणारा ध्वनी हा एकाच ध्वनी-एककाचाबनला आहे की एकापेक्षा जास्त यावर बरेच काही अवलंबून असते.

ध्वनी एककम्हणजे नक्की काय? 
ध्वनी-एककयाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. 1) ध्वनीचा सर्वात सुक्ष्म भाग म्हणजे जाणीवांना उमगणारा ध्वनी-एककहोय. याला अचूकतेने मराठीतून आपण व्यंजन व स्वर या नावाने ओळखतो, 2) उच्चारीत ध्वनीचा सर्वात सुक्ष्म भाग म्हणजे ऐकू येणारा ध्वनी-एककहोय. याला आपण अक्षरनावाने ओळखतो.

ध्वनी-एककयाचे असे दोन भाग केवळ मराठीसाठी आणि मराठीपुरतेच मर्यादित आहेत का?
नाही.

म्हणजे तुमच्या मतानुसार हे ध्वनी-एककसर्व मानवी भाषांना लागू पडतात का?
होय.

हे असे तुम्ही कसे म्हणू शकता?
जगातील कोणत्याही भाषेतील वाक्य घ्या. वाक्यात शब्द असतात. शब्दात अक्षरेअसतात. त्यांना वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत. इंग्रजीत त्यांना सिलॅबल’ (Syllable) म्हणतात. ‘Syllable’ चा इंग्रजीला कळलेला अर्थ ‘A syllable is the part of a word usually pronounced as a unit’ असा मोघम आहे कारन त्यात त्यांना ‘usually’ म्हणजे सामान्यपणेअसा शब्द घालावा लागला आहे. पण मराठीतील व्यंजन व स्वर यांची व्याख्या अत्यंत सुक्ष्म असल्याने मानवाच्या कोणत्याही भाषेला मराठी अक्षरहे उच्चारीत ध्वनी-एककहे प्रमाण लागू पडते. अगदी जगातील मानवी भाषांच्या 24 कुटूंबातील सर्वांना हेच अक्षर - उच्चारीत ध्वनी-एककहे प्रमाण लागू पडते.

मला यावर अधिक माहिती हवी आहे जेणे करून तुमचे मत योग्य असल्याचे सिद्ध होईल. मला ही माहिती मिळेल का? 
हो नक्की यासाठीच तर फेसबुकवर जाणीवजनकहा ग्रुप स्थापन केला आहे.

अजून बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची उत्तरे मिळतील का?
होय. त्यासाठीच जाणीवजनक’ https://www.facebook.com/groups/next.marathi/ वा https://www.facebook.com/groups/perceptor/ या ग्रुपवर सामिल व्हा. तुमचे भाषीक प्रश्न मांडा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा.
आपला, शुभानन गांगल   मोबाईल 9833102727 ईमेल gangal@gmx.com वेबसाईट -

No comments:

Post a Comment